Ad will apear here
Next
ग्रीन सोसायटी स्पर्धेचे पारितोषिक वितरण

पुणे : ‘घरातील कीटक, डास, झुरळे यांचा नाश करण्याच्या नादात जी रासायनिक फवारणी, कॉईल जाळण्याचे  प्रकार घरात चालतात, त्यामुळे कर्करोग, फुफ्फुसाचे आजार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. या फवारणीमुळे प्रदूषणाला सुरुवात होऊन, पर्यावरणाचा ऱ्हास होताना दिसत आहे,’ असे मत ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांनी व्यक्त केले. 

‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’ तर्फे आयोजित ‘ग्रीन सोसायटी’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ. माधव गाडगीळ यांच्या हस्ते झाले. या समारंभात डॉ. गाडगीळ बोलत होते.  

डॉ. माधव गाडगीळ म्हणाले, ‘समाजात होणाऱ्या विविध प्रकारच्या प्रदूषणाबाबत अनेकदा चर्चा होते. परंतु त्याची सुरुवात आपण घरातूनच करत असतो. घरामध्ये विविध प्रकारचे फवारे वापरणे, कीटकनाशके यामुळे आपण नकळत हवा आणि पाण्याचे प्रदूषण करत असतो. प्रदूषण नियंत्रणाची सुरुवात प्रथम घरापासून व्हायला हवी. ऊर्जा, आणि पाणीबचत काळाची गरज आहे. त्या दृष्टिकोनातून रोटरी क्लब गांधीभवनचा ‘ग्रीन सोसायटी स्पर्धा’ हा उपक्रम स्तुत्य आणि समाजोपयोगी ठरेल.’
 
यावेळी रोटरीचे माजी प्रांतपाल विनय कुलकर्णी , ‘रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन’चे अध्यक्ष गणेश जाधव,  ‘गंगोत्री ग्रीनबिल्ड’चे राजेंद्र आवटे, रोटेरियन गिरीश मठकर आणि विश्वास लेले उपस्थित होते. 

ग्रीन सोसायटी स्पर्धा व्यक्तिगत सदनिका, बंगला, एक इमारत सोसायटी तसेच मोठ्या गृहसंकुलांसाठी खुली होती. पुण्यातील एकूण ४५ सोसायटयांनी सहभाग नोंदविला होता. 

‘स्पर्धेत सौर ऊर्जा वापर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, कचरा निर्मूलन, पाणी बचत, वृक्षारोपण, बायोगॅस या निकषांद्वारे मूल्यमापन करण्यात आले,’ असे स्पर्धेचे निमंत्रक विश्वास लेले यांनी सांगितले. 

राजेंद्र आवटे म्हणाले, ‘शहरीकरणामुळे नैसर्गिक संपदेवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. म्हणून प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे. याकरिता अशा प्रकारच्या स्पर्धेची गरज भासत आहे.’ 

‘पुणे पालिका, रोटरी क्लब ऑफ पुणे गांधी भवन, सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्हज्, गंगोत्री ग्रीनबिल्ड, पुणे जिल्हा सहकारी गृहनिर्माण महासंघ, सस्टेनेबल लिव्हिंग इंटिग्रेटेड सोल्युशन्स या संस्थांनी एकत्रितपणे या स्पर्धेचे आयोजन केले होते,’ अशी माहिती प्रास्ताविकात गणेश जाधव यांनी दिली. आभार गिरीश मठकर यांनी मानले. 

स्पर्धेचे परीक्षण पर्यावरण क्षेत्रातील विविध विभागातील तज्ज्ञ अनघा पुरोहित, मनीषा कोष्टी, धनश्री कुलकर्णी, अमरनाथ चक्रदेव आणि निरंजन उपासनी यांनी केले. 

स्पर्धेचा निकाल :
एक सदनिका / घर यामध्ये प्रमोद तांबे (‘स्नेह सेवा’, सदाशिव पेठ) यांना, तर वैयक्तिक बंगला / रो हाऊस विभागात प्रथम क्रमांक मयूर भावे (‘वूडलँड्स ड्रीम’, कोथरूड) आणि व्दितीय क्रमांक : जितेंद्र गानला (कोथरूड) यांना मिळाला. 
एक इमारत सोसायटी विभागामध्ये स्टर्लिंग हॅबिटॅट (बावधन) विजेते ठरले. गृह संकुल विभागात प्रथम क्रमांक युथिका (बाणेर),  व्दितीय क्रमांक रोहन सेहेर (बाणेर) आणि तृतीय क्रमांक रहेजा वूड्स (कल्याणीनगर) यांना मिळाला. परीक्षक मंडळाचा विशेष पुरस्कार कुमार सबलाईम (कोंढवा) आणि न्याती एन्विरोन्स (विश्रांतवाडी) यांनी पटकाविला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZTMBM
Similar Posts
डॉ. गाडगीळ सात ऑगस्टला ‘मसाप गप्पा’मध्ये पुणे : आपल्या सोप्या आणि सहजसुंदर शैलीतून विज्ञानविषयक लेखन करणारे प्रसिद्ध लेखक आणि ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मसाप गप्पा’ या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सात ऑगस्ट २०१८ रोजी सायंकाळी ६.३० वाजता, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे
‘नवीन उद्योगांसाठीचे झोनिंग अॅटलास आवश्यकच’ पुणे : ‘कोणत्याही जिल्ह्यात नवीन उद्योगांची आखणी करण्यापूर्वी त्या जिल्ह्यातील उद्योगांसाठीचा ‘झोनिंग अॅटलास’ लक्षात घेणे आवश्यक ठरते. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बहुतेक सर्व जिल्ह्यांसाठी हे अहवाल बनवले आहेत ;परंतु माझ्या माहितीनुसार हे अहवाल दडपले गेले असून, ते लोकांसमोर आणणे गरजेचे आहे’, असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ
‘कॅन्सर केअर’ला वैद्यकीय उपकरणे भेट पुणे : कर्करोगावर मोफत उपचार करणाऱ्या कॅन्सर केअर सेंटरला रोटरी क्लब ऑफ पुणे गांधीभवन यांच्याकडून वैद्यकीय उपकरणे भेट देण्यात आली. केअर इंडिया मेडिकल सोसायटीच्या विश्रांती कॅन्सर पॅलिएटिव्ह केअर सेंटर आणि मातृसेवा  डायग्नोस्टिक सेंटरमधील  गरजू कॅन्सर रुग्णांसाठी पेशंट ट्रॉली, लिम्फडेमा पंप,
साहित्य संमेलनाचा सीएसआर उपक्रम पुणे : पुण्यामध्ये येत्या रविवारी २८ जानेवारी रोजी ‘यात्रा परिक्रमा साहित्य संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. साहसी अध्यात्मिक यात्रा परिक्रमा आणि त्यातून निर्माण झालेले साहित्य, त्यांची विक्रमी विक्री यातून सुरू झालेले विविध सामाजिक, सांस्कृतिक, पर्यावरण विषयक, लोकजीवन आणि ग्रामीण शहरी जीवनशैलीचा समन्वय

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language